Saturday, October 6, 2018

Renuka Devi Ashtak


।।रेणुका देवी अष्टक ।।
।।श्री गजानन प्रसन्न।।
।।श्री नीळकंठेश्वर प्रसन्न।।
।।श्री रेणुका देवी प्रसंन्न।।

अष्टक

आश्विन शुध्द पक्षी अंबा बैसे सिंव्हासनी हो प्रतिपदे पासुनी घटस्थापना करोनी हो मूळ मंत्र जपुनी वृक्ष पाळ ठेवूनिया हो
उदो म्हणा उदो म्हणा येमा बाई माउलीचा हो आनंदे खेळसी काय वर्णू महिमा तिचा हो उदो म्हणा ।।१।। ।।धु ।।

द्वितीयेच दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकळा मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरोनि हो उदो: कार गर्जती समस्त चामुंडा मिळोनी हो ।।२।। ।।उदो म्हणा - धु।।

तृतीयेच्या दिवशी बाईने श्रुंगार मांडीला हो । खळीव पातळ चोळी वरती हार मुक्ता फळा हो ।
कंठीची पदक कासे पीतांबर पिवळा हो । अष्टभुजा मिविती बाईचा सुंदर दिसे कळा हो ।।३।। ।।उदो म्हणा - धु ।।

चथुर्थिच्या दिवशी विश्व व्यापक भवानी हो । नवरात्र करीती निरहार तो निर्वाणी हो ।
त्यासी तू प्रसन्न जगन्माता मन मोहिनी हो । भक्तांची माउली भक्त येती लोटांगणी हो ।।४।। ।।उदो म्हणा - धु।।

पंचमीच्या दिवशी वृत्त उपांग ललिता हो । भक्ती पुरस्कारे तूझे चिंतन करीती हो ।
रात्रीच्या समयी करीती जागरण हरी कथा हो । आनंदे नाचता काय वर्णू महिमा तिचा हो ।।५।। ।।उदो म्हणा - धु।।

षष्टीच्या दिवशी भक्ती आनंद वर्तीला हो । करी दिवट्या घेवूनी हर्षे गोंधळ घातला हो ।
कवडीया भूषणं गळा घालूनी मोहन माळ हो । जोगवा मागता प्रसन्न झाली भक्ता कुळा हो ।।६।। ।।उदो म्हणा - धु।।

सप्तमीच्या दिवशी सप्तश्रुंग गडावरी हो । तेथे तू राहसी बहुत पुष्प नाना परी हो ।
जाई-जूई शेवंती पूजा देखिली भवानी हो । भक्त संकटी पडता झेलुनी घेशी वरचे वरी हो ।।७।। ।।उदो म्हणा - धु ।।

अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी हो । सह्याद्री पर्वती उभी देखिले भवानी हो ।
मन माझे मोहिले शरण आलो तूझा लागुनी हो । स्तनपान देवुनी सुखी केले अंत: करिणि हो ।।८।। ।।उदो म्हणा - धु ।।

नवमीच्या दिवशी नव्या दिवसाचा पारणा हो सप्तशतीचे जप होम हवन करीती हो
पक्वान्नाच नैवेध्य केले कौमारी पूजना हो आचार्य ब्राह्मण तृप्त केले जगदंबेन हो ।।९।। ।।उदो म्हणा - धु।।

दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोलंघना हो अश्वारूढ होवुनी करी शास्त्रते झळकती हो
मारिले दानवा शुंभ निशुंभ ऐसे किती हो विप्र रामदास बाईने धरिले हाती हो ।।१०।। ।।उदो म्हणा - धु।।



अष्टक

अंबुज दळ लोचनी आदि शक्ति नारायणी हो अनंत सुख दायिनी अम्बे सुंदर गिरीजा नंदिनी हो
अगम मनमोहिनी, अगाध लीला अविनाशिनी हो आणि एक मणि अपूर्व शोभे सिंव्हासनी हो ।।१।। ।।अंबुज - धु।।

भुवनेशी व्यापक खेळ खेळसी कौतुके हो भूल विसी सकळिका भवानी विष्णु ब्रह्मादिका हो
तेने कलि कंटक भंगुनी जाती कलि कंटक हो भक्तांचे पोशक भासे मजला देई एक हो ।।२।। ।।अंबुज - धु।।

निगमागम गर्जती नाना परिमळ गुण वर्णती हो कळे तुझी मती गाता उपमा नाही तुझ भगवती हो
निर्वाणी सुरपती निरंजन अवघे तुझा चिन्तिती हो नारद तुम्बर गाती नाम घेता संतोषती हो ।।३।। ।।अंबुज - धु।।

देवी तुझ विण दैवत नेणे आणि एक जण हो दयावंत होवुनी देई अपूले वरदान हो
दाखवी चरण दयाले मी तो तुझा दीन हो दिना दर्शन देई दासा गोसावि नंदना हो ।।४।। ।।अंबुज - धु।।

अष्टक

उदो उदो भवानी त्रिपुरे चंड मुंड मर्दिनी हो म्हैशासुर सव्हारणि तुळजाराम वरदायिनी हो ।।धु।।
आवेशे प्रकटुनी खेळ खेळसी जननी हो कळे तुझी लीला वदती हरी हरा मुनी हो ।।१।। ।।उदो उदो - धु।।

मातापूर अवतार माय रेणुके धरियला हो धृष्ट्पाल सुटला तेणे सूरपती आनंदला हो
दिवट्या सुमन माळ घेवूनी सामुदायासी आला हो चव्हाक्याचा घोष रंगी गोंधळ घातला हो ।।२।। ।।उदो उदो - धु।।

विश्वापाळूनी अम्बा बहुज नगरिचे रहवासी हो दैत्य उन्मत झाले खड्ग धरिले संहारासी हो
मुनिजन प्रतिपाळिसि महिमा वर्णवे वेदांसी हो शरणागत तुझ आलो हरी रघुनाथा सद्भावसी हो ।।३।। ।।उदो उदो - धु।।

अष्टक

शिवे चित्कल्लोळे परम विमले मंगळ मये । मुखे वर्णु काय सकळ गुण आनंद निलये ।
दयाळे श्री बाळे हरी हरादीक जपती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।१।।

अहो अंबाबाई परात्पर रूपे प्रकटसी । किती हि ब्रह्मांडे सजुनी सृष्टी संहार करीसी ।
पुराण शटशास्त्र  बहु तुझी ख्याती वदति । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।२।।

महा विद्ये माते अमर वरदे पार न कळे । उभे व्यक्ता व्यक्त नमन प्राण रूप न कळे ।
तुला ध्याता भावे त्रिविध भवताप शमती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।३।।

अम्हा भक्ता साठी सगुण सदये रूप धरिले । शिरी वेणी कानी लखलखती ताटंक युगले ।
कसे नाके बहु अलंकार मुक्ताफळ वसती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।४।।

वरी नेत्रांबुजे करुनी तनू अष्टभुजा । महोत्साहे तुझी सूरमूनी करिती संपादुनी पूजा ।
उदो शब्दे हाति धरुनी दिवट्या नृत्य करिती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।५।।

चिरे पुष्प गंध घवघवीत ताम्बूल वदनी । आम्हा कैच्या सिद्धी वसती तुझपासि निसिदिनी ।
तुझे तेजे दुर्गे तरुनी तरुनी कोटी हरिती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।६।।

नमो विश्वाधारे अभिनव तुझे रूप न कळे जननी । प्रतापे दुष्टाला वधूनी विजयी तू त्रिभुवनी ।
उभे द्वारि इंद्रदीक निकट सेवेत असती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।७।।

मला पावे वेगे हृदय न करी निष्टूर कदा । कृपेने तू पाहि भूलवसी तू घोर संसार समुद्रा ।
तुझ्या भक्ती विण विशेष मज काहीच न लगती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।८।।

चिदानंदे देई निज भजन तेणे भ्रम हरे । प्रपंचाच्या धंदा सहज अवघा याम धनूरे ।
स्वभावे गोसावी सूत करीतसे हेची विनंती । सदा राहे ध्यानी जय जय भवानी भगवती ।।९।।

अष्टक

जय परात्परे पूर्ण चिन्मये, भगवती महा मंगलालये । अगाध ईश्वरी विश्व व्यापिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।१।।

दीन वत्सले पाय दाखवी, तारि भैरवी या भवार्णवि । निवारि तापावो आनंद दायिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।२।।

प्रपंच काननी टाकिले मला, मार्ग चूकलो ध्यातसे तुला । तुझे कृपे विणे भय कसे चुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।३।।

परम मूढवो जाण निश्चये, घडे मनासी हे नाम हि न ये । म्हणवितो तुझा रंक कालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।४।।

विषय जाळिया चहूकडे अती, काम क्रोध हे व्याघ्र गर्जती । राख संकटी भ्रांती नाशिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।५।।

हेची मागणे लाविसी मनि, हृदय ग्रंथी हे छेदी योगिनी । नुपेक्षी कदा भक्त पालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।६।।

आश्रयो नसे आणखी जनी, बालकासी तू सांडीसि वनी । धाव घे कडे, माये रेणुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।७।।

काही नाठवे विचार हि मनी, वृथा भ्रमतसे दिवस यामिनी । प्रकट होय तू ज्ञान दीपिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।८।।

श्रीदयानिधे त्रिपुर सुंदरी, सर्व साक्षिणी भेटी लवकरी । गोसावी नंदना विनवी चंडिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।९।।

अष्टक

अंबे महा त्रिपुर सुंदरी आदि माये, दारिद्र दुखं भव हारूनी देवी पाहे ।
तूझी अगाध महिमा वदते पुराणी । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।१।।

लज्जा समस्त तुजलासी निज बालकाची । तू माउली अती स्वये कानुवाळूसाची ।
व्हावे प्रसन्न मजला परिसोनिधानि । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।२।।

आता क्षमा कारीशी अपराध माझा, मी मूढ केवळ असे परीदास तुझा ।
तू सांडशील मजला जनि ओनिधानि । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।३।।

हे चालले वय वृथा मूकलो प्रपंची, तेणे करुनी स्मृता न घडे मनीची ।
दुख:र्णवात बुडतो धरी शीघ्र पाणि । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।४।।

निष्ठुरता जरी मनी धरशील आई, रक्षील कोण मजला सांग उपाय काही ।
तुझाची आश्रय अस जन सत्यामानी । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।५।।

तू धन्य या त्रिभुवनात सत्कार्य करीसी, धाके तूझे फळसुटे रीपुदान वासी ।
येथे पूजेसी बैसुनी सुरवर न येई मानी । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।६।।

जाळी तसे बहुत हा भवताप अंगी, त्याचे निवारण करूनी निज भेटी योगी ।
आनंद सिंधू लहरी गुण कोण वाणी । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।७।।

तेणे पदार्थ तुझ वाचुनी आणिक काही, तूच माय बाप अवघा गणगोत काही ।
आणी एक देव दूसरा हृदयात न आणि । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।८।।

जैसा कळेल तुझ लागुनी पायी, तैसी मी प्रार्थितो सकळ साक्ष विधान ऐसी ।
गोसावी नंदन म्हणे मजलाओविधानी । श्री रेणुके भगवते वरदे भवानी ।।९।।

अष्टक

सखये मातापूरासी जाईन, अंबा माझी पाहीन, मोहळ तीर्थ मी राहीन, तीर्थ स्नान करीना हो ।
दीन दासाचा दास हो, तुझ्या चरणी राहीन, धन्य मातापूर आवाडे ऐकोनी या पोवाडे, मन माझे मोहतसे हो, केव्हा टाकेन उडी ।
अंबा तू माय अंबिके जगदंबिके, महा माय रेणुके भक्तासी मुक्ती देई हो । मूळ पीठ नायीके, अंबा तू माय अंबिके जगदंबिके ।।१।। ।।धु।।

मातापूर उंच पर्वत, अंबे अवघडे वाट, आरण्य महा डोंगर । वृक्ष लागले दाट, कठिण मार्ग ह दिसतो, पुढे कळे न वाट, मूळ पीठ द्रुष्टीम्या देखिले, अंबे हरतील कष्ट ।।२।। ।।अंबा तू माय अंबिके - धु।।

महाराष्ट्र हो स्वप्नी सांगती, ऐका साजप्या बाई, निळ्या घोड्या वरती स्वार हो । पहिले स्वार येमाई, अणिख दोघे जण संगती, मल्ल भैरव बाई, चौसष्ट योगिनी समवेत, उदो उदो बोलती ।।३।। ।।अंबा तू माय अंबिके - धु।।

मार्गी हो चालत शीणलो थोर कष्ट भारी, सुख दु:ख सांगेन तुझ पाशी । अंबा माझी कैवारी, तूझी हो तारक आम्हासी, भवसागर तारी, किती हो निर्वाणे पाहसी, कष्ट दोष निवारी ।।४।। ।।अंबा तू माय अंबिके - धु।।

काय वर्णू तूझी स्तुती हो, अंबे न कळे लीला, शिण भाग माझा हरला । अंबे देखीयाला डोळ, लावण्य रूपाची सुंदरी, अंबा सत्रावी कळा, साज्या पावाराची स्वामिनी, मूळ पीठ व्हेल्लळ ।।५।। ।।अंबा तू माय अंबिके - धु।।

अष्टक८ (आरती)

ओवाळीन ओजा शिव सहजा, आदि भवानी गिरीजा, कल्लोळ स्थळजा, चारीभुजा आई तूकाई तुळजा ओवाळीन ओजा ।।१।। ।।धु।।

भक्त वरदाई, ये माई, माता रेणुका तनूजा, शाखांबर भर्गा, नवदुर्गा, हिंगुळगिरी हिंगुळजा, निवासपुर लक्ष्मी, महालक्ष्मी, कोल्हापुर पट्टणजा, ओवाळीन ओजा ।।२।। ।।ओवाळीन ओजा - धु।।

मूका मीनाक्षी, कामाक्षी, सर्वही कलीकंटकजा, व्याघ्राल्ले पुरजा, गोकुळज, भिल्लनिरनिर्जित कुंजा, पट्टणपुर चंडी, श्री चंडी, निर्जल देशी पूजा, कोटी मुख ज्वाला, श्री बाला, विमला मंगल गिरिजा, ओवाळीन ओजा ।।३।। ।।ओवाळीन ओजा - धु।।

देह भ्रमगलिता, श्रीललिता, पूजे मिन सुखकलिता, अम्बाडंबरजा, सलवटजा, विवाह मंडप स्थळजा, विद्या जल सदना, दनुकदना, देवी योगा तनया, त्रिविधगुणा, संत धिमि धिमि धिमिता, ओवाळीन ओजा ।।४।। ।।ओवाळीन ओजा - धु।।

तारा भुवनेशी, पंचदशी, ब्रह्मानंदी गिरिजा, दर्या ईगाक्षी, पागाक्षी, लंकांकित ऋषिवटजा, कोंकण स्थळवटजा, पंकजजा, रावण सुरमर्दनजा, अनेक पुरवरजा, अमितभुजा, काशी रूपा गिरिजा, योगेश्वर विद्या, श्रीविद्या, विमला माणिक पूजा, ओवाळीन ओजा ।।५।। ।।ओवाळीन ओजा - धु।।


7 comments:

anjali kulkarni said...

माता पूर उंच पर्वत ही आरती आम्ही लहानपणी 8 कडवे ची ऐकली आहे ती पूर्ण आरती तुमच्याकडे असेल तर जरूर post करावी

Liladhar kulkarni said...

माता पूर उंच पर्वत । दीर्घ दिसत। अंबे अवघड घाट।। आरण्य महा हो डोंगर उंच शिखर।। वृक्ष लागले दाट कठीण मार्ग हा दिसतो जीव बिहीतो ।। पुढे न कळे वाट मूळपिठ अंबा मी देखीली चित्ती ओळखीली सकळ हारतील दोष।।१।।
अंबा व माय तु अंबीके जगदंबीके मोहन माया रेनुके भक्तासी मुक्ती तु देई हो अंबाबाई हो।।धृ।।
मार्गी चालत शिणलो बहु हारलो थोर कष्टलो बाई।
सुख दु:ख सांगेन तुज पासी अंबा पुरवीसी तुची माझी कैवारी। तुची हो तारक आम्हासी जगन्नीवासी भवसागर तारी आता तु किती निर्वानी पाहसी कदा दोष निवारी।।२।।
मराठीनी बाई स्वप्न सांगती वाक्य बोलती ऐके तू करणी बाई निळ्या घोड्या वरी स्वार हो गळा हार हो
पहीली येती ये माई आणिक चौसष्ट योगिनी पुढे धावूनी उदो बोले तुकाई आणिक दोघे सांगाती पुढे चालती मल्हार भैरव भाई।।३।।
काय वर्णू तुझी स्तुती हो बहु किर्ती हो अंबा आकळ निळा शीण भाग माझा हरला सुख जीवाला अंबा देखीली डोळा लावण्य रूपडे सुंदरी दिसे कुमारी अंबा सत्राविकळा सरफीणी बाईची स्वामिणी मुक्ती देऊनी
अंबा दिसे वेल्हाळा।।४।।

Liladhar kulkarni said...

कृपया अनखी कुन्हाकडे काही अष्टक किंवा आरत्या असल्यास कृपया पोष्ट करा

Unknown said...

देवीचा धावा आहे का तुमच्याकडे

संजय शा. बहाड said...

ही आरती गायलेल्या स्वरूपात असल्यास कृपया sanjay.bahad@yahoo.com या ई-मेल वर अथवा 7738158551 वर whatsapp करावे.

Unknown said...

आहे

श्रीकृष्णः शरणं said...


अष्टक

अंबे का मज धाडिले जगति या दुःखार्णवी मग्न मी
होई सह्य न हा असह्य छळ या चिंता न होती कमी।
झालो आतुर भेटण्या तुजसि गे कंटाळलो मी असे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ।।।१।।
आपत्ती नग कोसळे मजवरी होभ्रांत शोकाकुल
लोभे कष्ट करी अपार छळिती नानापरी हे खल ।
झाले विन्मुख आप्त इष्ट सगळे आता करावे कसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ।।२।।
बघुन ह्दय हे पाणावती लोचन
नाही शक्तिदिली तया हसविण्या हो खिन्न माझे मन ।
साधु संत जसे सतेज दिसती ते तेज माझे नसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ||३||
अन्यायी असती वरुन दिसती न्यायी हितैषी जन
अज्ञाने भुललो गुरु समजुनी केले वृथा पूजन।
सारे व्यर्थीचे हे मला दिसतसे तथ्यांश काही नसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ।। ४ ।।
साधु संत जगात खास अस्ती शंकाच नाही मनी
त्यांची पारख काय हे न समजे सांगेल का हे कुणी ?
आई दाखव तू च संत मजला मानेन मीही तसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ।। ५ ।।
संसारी पडलो तिथेच रमलो मोहे मदे ग्रासलो
सत्ता वैभव स्वार्थ याविण दुजे नाही कधी बोललो
केले पाप अपार दूर करण्या सामर्थ्य माझे नसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ।। ६।।
झालो तप्त भवार्त व्याकुळ आणि गेलो मी भांबावुन
व्याधीग्रस्त असा अशक्त उरलो वार्धक्य ही त्यातून ।
गात्रे शिथील त्यात त्राण नुरले लोकात होई हसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ||७||
कीर्तिची मजला नसे मुळीचही इच्छाच या जीवनी
साक्षात्कार तुझा कधी घडविशी हा ध्यास लागे मनी।
आई अंत नको बघु तव पदा श्रीपाद वंदीतसे
माते कोण मला तुझ्याविण दुजा त्राता जगी या असे ।।८।।

Mate kon mala | Renuka Mata Ashtak 1 | Navaratri Special | Varsha Bapat
https://youtu.be/BdKG63JJjEc